मोहंमद रफिक यांचा सेवागौरव; सेलूतील गुलमोहर कॉलनीमध्ये कार्यक्रम
प्रतिनिधी, सेलू : शेवली येथील अलिजोहर उर्दू हायस्कूलमध्ये ३० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त शिक्षक मोहंमद रफिक यांचा मुस्लिम एज्युकेशन ॲंड वेलफेअर सोसायटीच्या वतीने सेवा गौरव करण्यात आला. गुरुवारी, ९ मे रोजी गुलमोहर कॉलनीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी शफिक अली खान, अभियंता अनिस कुरेशी, शेख महेमूद, निसार पठाण, शेख मौजम सर, रशीद खान इंजीनिअर, हारूण शेख, इमामोद्दीन, शेख असगर, शेख शमशोद्दीन, जकी सिद्दीकी, इम्रान कुरेशी यांची उपस्थिती होती. मोहंमद रफिक यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. माणसाने जीवनात सतत चांगले कर्म करावे असे रफिक यांनी नमूद केले. सूत्रसंचालन हारुण शेख यांनी केले.