NH548 B : सेलूतील राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट; बेशरमाची झाडे लावून निषेध

NH548 B : सेलूतील राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट; बेशरमाची झाडे लावून निषेध

सेलू जि. परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याचा निषेध दुभाजकामध्ये बेशरमांची झाडे लावून गुरुवारी, १६ मे रोजी करण्यात आला. 

एक वर्ष झाले तरीही पाच किलोमीटर अंतराचे काम संपलेले नाही. संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची माती विकून सेलूकारांची माती केली आहे. या रस्त्यावरील दुभाजकामध्ये शोभेच्या झाडे लावण्यासाठी काळ्या मातीऐवजी सर्रास दगडांचा उपयोग केला जात आहे. या रस्त्यावरील पथदिवे दोन महिन्याच्या वर झाले तरी सुरू झाले नाहीत. यामुळे अपघात होत आहेत यात अनेक जण जखमी झाले आहेत व काहींनी आपला जिव गमावला आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनीयरला वारंवार माहिती देऊनही यांनी यावर काहीच कार्यवाही झाली नाही. याचा निषेध म्हणून याया रस्त्यावरील दुभाजकांच्या दगडावर रांगोळी काढून यावर बेशरमाची झाडे लावण्यात आली.‌ अजूनही नीट कामे केली नाही तर याहून तीव्र आंदोलन सेलूवासियांतर्फे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या वेळी जयसिंग शेळके, अक्षय सोळंके, रवि मोगल, नरेश पांचाळ, गणेश काचेवर, कैलास बोराडे, पांडुरंग सावंत, सतिश आकात, शिवम गटकळ, हाके सर, पप्पु कदम, लक्ष्मण बोराडे, प्रद्युम्न शेळके, विकी राठोड, विश्वंभर दिक्षित, परवेज सय्यद, इरफान बागवान उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!