महाराष्ट्र राज्य तलाठी संघ : परभणी जिल्हाध्यक्षपदी शामसुंदर सूर्यवंशी, यशवंत सोडगीर सरचिटणीस
परभणी : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी १९ मे रोजी झालेल्या बैठकीत परभणी जिल्हा तलाठी संघाच्या नूतन कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी शामसुदंर सूर्यवंशी, तर सरचिटणीस म्हणून यशवंत सोडगीर यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष मुकुंद आष्टीकर, प्रशांत राखे, देवेंद्रसिंह चंदेल, विजय बोधले, भरत ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नूतन कार्यकारिणी अशी जिल्हाध्यक्ष शामसुदंर सूर्यवंशी, सरचिटणीस यशवंत सोडगीर, कार्याध्यक्ष रामप्रसाद कोल्हे, मोहसीन पठाण, उपाध्यक्ष शंकर राठोड, धनंजय सोनुने, सहसचिव माधव कुरेवाड, रमेश लटपटे, कोषाध्यक्ष धनंजय टेकाळे, हिशोब तपासनीस विजय राठोड, संघटक भास्कर काकडे.