महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात; शिवा संघटनेतर्फे सेलूमध्ये कार्यक्रम
सेलू : शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. श्री कैलास मिटकर स्वामींच्या मंत्रोच्चारात बसवेश्वरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या गुरुबसअप्पा पंचगल्ले प्रसंगी गणपतअप्पा मिटकरी, दगडाय्या स्वामी, जनार्धनअप्पा पाचलेगावकर, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष निजलिंगअप्पा तरवडगे, शशिकांत बिहाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बिहाडे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. श्री.तरवडगे, म्हणाले समाजातील व्यक्ती, विभूतींनी आपापला व्यर्थ अभिमान, अहंकार बाजूला ठेवून शिवा संघटनेसारख्या कर्मयोगी संघटनेसोबत आले पाहिजे. प्रास्ताविक प्रदीप डफुरे, सूत्रसंचालन शिवकुमार नावाडे यांनी केले. बालासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रकाश साखरे, सुजित मिटकरी , नवनाथ सोनटके, सुनिल नवघरे, बबनअप्पा झमकडे, गणेश केशरखाने, मनोहर चलोदे, देवराव चौरे, सुधाकर गबाळे, दत्तात्रय हिंगे, केदार तरवडगे प्रकाश कोलीपाका आदींनी परीश्रम घेतले.