साईबाबा बँकेला भारतरत्न सहकारिता सन्मान पुरस्कार प्रदान
सेलू (जि.परभणी) : येथील साईबाबा नागरी सहकारी बँकला भारतरत्न सहकारिता सन्मान – २०२४ अंतर्गत ‘बेस्ट डायरेक्टर ऑफ द ईअर’ आणि ‘बेस्ट डिजीटल पेमेंट इनिशेटिव्ह’, या दोन पुरस्कारांनी २२ मे रोजी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. भारत को ऑपरेटिव्ह बँक मुंबई या संस्थेच्या वतीने साईबाबा बँकेची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली होती. सोमेश जोशी यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी पुरस्कार स्वीकारला.