SSC Results 2024 : कान्हेकर शारदा विद्यालयाचा निकाल ८५.७१ टक्के; शेख रिहान सर्वप्रथम
सेलू : मार्च २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाचा निकाल ८५.७१ टक्के असून शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.एकूण अठ्ठावीस विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. चोवीस उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम शेख रिहान अहमद ८२.२० टक्के, व्दितीय श्रीकृष्ण बाबुराव गिरी ७७.४०, तृतीय आकाश प्रभू सोळंके ७७.२०, तर चौथ्या क्रमांकावर यादव दत्तराव कोरडे ७५ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. कृष्णा तानाजी कुकडे ७४.८० आदित्य संदीप जवळकर ७०.२० वैभव भारत उगले ६९.४०, पूजा शाम कारके ७३.२० शेख अल्फिया रियाजोद्दिन ६४.२०, शेख जुनेद मकसुद ६०.४० असे सहा विद्यार्थी प्रथम श्रेणी, सात द्वितीय श्रेणी व सात विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. गुणवंतांचे संस्थाध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, सहसचिव सुनील डख, प्राचार्य डॉ.ए.एम.डख, जयप्रकाश बिहाणी, रामनाना पाटील, श्रीबल्लभ लोया, अशोक मंत्री, दिपकराव खराबे, प्रल्हादराव कान्हेकर, प्रफुल्लचंद्र बिनायके, नंदकिशोर बहिवाल, प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे, कार्यकारी मंडळाचे सदस्य, मुख्याध्यापक डी.डी.शिंदे ,भरत रोडगे, एस.एच.चारठाणकर , सुभाष मोहकरे, अभिमान पाईकराव, आर. व्ही.चव्हाण, विजय हिरे, एस.एम. जुमडे, बी.आर.साखरे, उषा कामठे, सीमा उंडे, आनंद देवधर, बालासाहेब टरपले, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे आदींनी अभिनंदन केले आहे.