वाळूमाफिया शिरजोर : वाळूसाठी ‘गाढवं’ही नदीपात्रात; मशीनद्वारेही बेसुमार उपसा सुरूच
मुळी बंधारा दुसलगाव गोदापात्रातून वाळूउपशावर पोलिस पाटील संगिता कचरे यांची करडी नजर असल्याने वाळूमाफियांकडून वाळू उपसा करून चक्क गाढवावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मोठा साठा केला जात आहे. याबाबत पोलिस पाटील कचरे यांनी तहसीलदार यांना कळवूनसुध्दा कार्यवाही शून्यच आहे. यामुळे वाळू माफिया शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे.
गंगाखेड (एम.बी.भिसे) : गंगाखेड तालुक्यातील गोदापात्र कोरडे पडल्याने गेल्या महिन्यांपासून सर्रास रात्री अकरा ते सकाळी आठपर्यंत वाळूचा उपसा जोमात सुरूच आहे. वाळूसह महातपुरी गोदापात्राजवळ मोठ्या प्रमाणात मर्यादेपेक्षा जास्त माती उत्खनन झाल्याने गोदावरीला पुराच्या धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतने वाळूसह माती चोरी संदर्भामध्ये महसूल प्रशासनाला लेखी कळवूनसुध्दा कार्यवाही शून्य असल्याने गोदावरीपात्र मात्र वाळू माफियांनी चाळणी केल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील चिंचटाकळी, गोंडगाव महातपुरी, धारखेड, झोला पिंपरी मसला, खळी, मुळी, दुसलगाव गंगाखेड परिसरातून गोदावरीचे पात्र वाहते यावर्षी पाऊस कमी झाल्याने गोदापात्र कोरडे पडले आहे. याचा फायदा वाळूमाफियांनी घेत रात्री मशीनद्वारे गोदापात्रास पोखरले जात आहे व हजारो ब्रास वाळू प्रशासनाच्या आशीर्वादाने उपसा केली जात आहे. महातपुरी ग्रामपंचायतने ९ मे रोजी दिलेल्या पत्रात महातपुरी शिवारातील वाळूच्या उपसासह माती चोरी थांबवा, असे पत्र देऊनही महसूल प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. महातपुरी गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास महातपुरीला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होणार आहे. गोदाकाठच्या प्रत्येक गावच्या परिसरात वाळू माफिया रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यत मोठ्या प्रमाणात वाळू उपशाचा खेळ केल्याने गोदापात्राची चाळणी केली आहे. याबाबत महसूल प्रशासनाला माहीत असतानासुद्धा महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. गोंडगाव, चिंचटाकळी या गावच्या गोदापात्रातून रात्रीच्या वेळी मशीनद्वारे वाळू उपसा केला जात आहे. महातपुरी शिवारामध्ये गोदापात्रात हायवा, ट्रॅक्टरने सर्रास वाळू उपसा व माती उपसा सुरू आहे. दुसलगाव मुळी गोदापात्रात केवळ दुसलगाव पोलिस पाटील सौ.कचरे यांच्या भितीने गाढवा द्वारे वाळू उपसा करून मुळी येथे साठा केला जात आहे तसेच धारखेड शिवारातील रेल्वे पुलाच्या खाली वाळू माफियांनी आपला ट्रॅक्टरचा ताफा घेऊन डेरा जमून प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत आहेत झोला,पिंपरी,मसाला परिसरात गोदापाञास पोखरण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे वाळू उपसा बाबत महसूल प्रशासन गप्प का व भूमिका बघ्याची का असा प्रश्न निर्माण झाला आहे.मैराळ सावंगी गोदापाञात वाळू धक्क्यावरून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याने गावाची झोप उडाली आहे.या वाळू उपसाने खळी ते मैराळ सावंगी या रस्त्याची चाळणी झाल्याने नागरिकांना अपघाताला समोर जावे लागत आहे. ही गंभीर बाब असून हा धक्का जरी सुटला असेल, तरी रात्रीचा वाळू उपसा बंद करा अशी मागणी जोर धरत आहे.
याला सेलू शहर प्रशासन जबाबदार आहे तसेच हफ्तेखोरी मुळे सेलू शहरात मटका , जुगार , गुटखा विक्री आणि रेती चोरी मागील बरह्याच महिनेपासून यांच्या वरद हस्ताने हा प्रकार चालू आहे …
मागे एका गरीब व्यापाराची मारहाण आणि दरोडा प्रकरण घडले अद्यापही चोरटे सापडले नाही …हीच यांची duty आणि लाचखोरी मुळे सर्व जण त्रस्त आहे..
….गंभीर परिणाम यापुढे पाहायला मिळतील असच जर प्रकार चालू असेल तर….
याला सेलू शहर प्रशासन जबाबदार आहे तसेच हफ्तेखोरी मुळे सेलू शहरात मटका , जुगार , गुटखा विक्री आणि रेती चोरी मागील बरह्याच महिनेपासून यांच्या वरद हस्ताने हा प्रकार चालू आहे …
मागे एका गरीब व्यापाराची मारहाण आणि दरोडा प्रकरण घडले अद्यापही चोरटे सापडले नाही …हीच यांची duty आणि लाचखोरी मुळे सर्व जण त्रस्त आहे..
….गंभीर परिणाम यापुढे पाहायला मिळतील असच जर प्रकार चालू असेल तर….