अक्षरदीप बालवाडीचे सेलूत उद्घाटन; भौतिक सोयीसुविधांसह दर्जेदार शिक्षणाची सोय 

अक्षरदीप बालवाडीचे सेलूत उद्घाटन; भौतिक सोयीसुविधांसह दर्जेदार शिक्षणाची सोय 

बालवाडीतील प्रत्येक वर्ग खोलीत बोलक्या भिंती, बालकांना अक्षर ओळख करून देण्यासाठी वर्ग खोलीत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बालकांना हसत, खेळत शिक्षण देण्यासाठी विविध साहित्य बालकांचे आकर्षण ठरत आहे. माफक दरात दर्जेदार शिक्षण व इंग्लिश स्कूलच्या धर्तीवर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे अशोक काकडे यांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले.

सेलू : छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सेलू येथील न्यू हायस्कूल शाळेच्या जैन मंदिर परिसरातील अक्षरदीप बालवाडीचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांच्या हस्ते शनिवारी, १ जून रोजी करण्यात आले. या वेळी शालेय समितीचे सदस्य ॲड.अशोक फोफसे, संतोष कुलकर्णी, प्राध्यापक विठ्ठल डख, गोपाळ काबरा, ॲड.गोविंद शेळके, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, मुख्याध्यापक किसन मोरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, दिनकर नखाते, अनिल शर्मा, रघुनाथ बागल, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, अशोक उफाडे, सचिन धापसे, किशोर कटारे, मंगल जोगदंड आदीची उपस्थित होती. जैन मंदिर परिसर शहराचा जुना भाग असून मध्यमवर्गीय वस्ती आहे. या परिसरातील बालकांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी न्यू हायस्कूल शाळेने अक्षरदीप बालवाडीची तिसरी शाखा स्थापन केली आहे. बालवाडीतील प्रत्येक वर्ग खोलीत बोलक्या भिंती, बालकांना अक्षर ओळख करून देण्यासाठी वर्ग खोलीत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बालकांना हसत, खेळत शिक्षण देण्यासाठी विविध साहित्य बालकांचे आकर्षण ठरत आहे. माफक दरात दर्जेदार शिक्षण व इंग्लिश स्कूलच्या धर्तीवर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे अशोक काकडे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन तोटावाड यांनी केले. धनंजय भागवत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मंजुषा बोराडे, प्रांजल नवले, सुनिता जोगदंड, रेखा आवटे आदींनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!