‘कविता मिरगाच्या’ काव्य मैफील रंगणार; सात जूनला सेलूमध्ये कार्यक्रम

‘कविता मिरगाच्या’ काव्य मैफील रंगणार; सात जूनला सेलूमध्ये कार्यक्रम

शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम

 

सेलू : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे संचलित स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त सहकार्याने शुक्रवारी, सात जून रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता ‘कविता मिरगाच्या’ काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य मैफिलीचे हे अकरावे वर्षे आहे. या वर्षी कवी मुकुंद राजपंखे ( आंबेजोगाई ), संदीप जगताप (नाशिक), कल्याण कदम (परभणी), भास्कर निर्मळ (छत्रपती संभाजीनगर), मधुरा उमरीकर (परभणी), अशोक पाठक (सेलू) आदी निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार (छत्रपती संभाजीनगर) करतील. कवी संमेलन यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांच्या मार्गदर्शनात चंद्रशेखर मुळावेकर, रमेश नखाते, डॉ.सतीश मगर, सुरेश हिवाळे, डॉ.शरद ठाकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत, एकनाथ जाधव, विलास शिंदे, महादेव आगजाळ, माधव गव्हाणे, पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके परिश्रम घेत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!