‘एक्झिट पोल’ जाधवांच्याच बाजूने; जानकरांनाही विजयाची खात्री !

‘एक्झिट पोल’ जाधवांच्याच बाजूने; जानकरांनाही विजयाची खात्री !

परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या सातही टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर शनिवारी, सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध सर्वेक्षण संस्थांचे ‘एक्झिट पोल’ विविध वाहिन्या, माध्यमातून झळकले. निकाल पूर्व कलचाचण्यांची चर्चा आता रंगू लागल्या आहेत. एक्झिट पोलनुसार परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांचा विजय होणार आहे, तर महायुतीचे उमेदवार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. यामुळे जाधव समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे, तर चार जूनच्या निकालात जानकर यांचा विजय निश्चित असल्याची खात्री जानकर समर्थकांना आहे. तथापि चार जून रोजी दुपारपर्यंत परभणी जिल्ह्याचा खासदार कोण ? हे निर्विवादपणे स्पष्ट होणार आहे. सोबतच केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, की इंडिया आघाडीला संधी मिळते. याचीही उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!