विद्यार्थ्यांना महसुली दाखले मोफत उपलब्ध करून देणार : आमदार मेघना बोर्डीकर 

विद्यार्थ्यांना महसुली दाखले मोफत उपलब्ध करून देणार : आमदार मेघना बोर्डीकर 

दीपस्तंभ प्रतिष्ठानचा उपक्रम : जिंतूर व सेलू तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सुविधा, गावोगावी जनजागृती

विद्यार्थ्यांनो, शैक्षणिक कागदपत्रे काढून घ्या : गतकाळात विद्यार्थांनी वेळेवर महसूली दाखले न काढल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे कळाले. वेळेवर कागदपत्रे काढली, तर शैक्षणिक प्रवेशासाठी कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना येत नाही; म्हणून दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम सुरू केलेला आहे. दरवर्षी हा उपक्रम राबवणार आहोत. जागरूक विद्यार्थी, पालकांनी उपक्रम समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा. – आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

सेलू (जि.परभणी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे दहावी, बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाकरिता विविध महसुली दाखल्यांची नितांत आवश्यकता पडते. विद्यार्थ्यांना महसूली दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत. विद्यार्थ्यांना या संदर्भात कोणत्याही अडचणी येवू नये म्हणून दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे जिंतूर व सेलू तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला,जातीचा दाखला, एसईबीसी – मराठा प्रमाणपत्र, नॉन – क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी. विविध दाखले प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता १०वी, १२ वीनंतर पदविका, पदवी प्रवेशासाठी शैक्षणिक कागदपत्रांची अत्यंत आवश्यकता असते. ऐनवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. पालक संभ्रमात पडतात. काय करावे? काय करु नये? अशी द्विधा मनःस्थिती यावेळी असते म्हणून वेळीच या संदर्भात जनजागृती करण्याचा निर्णय दीपस्तंभ प्रतिष्ठान यांनी घेतला आहे.

जिंतूर व सेलू तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा असून जिंतूर येथे अनिल उरटवाड ( 8793558310) हे समन्वयक आहेत, तर सेलू येथे प्रदीप चिंचाणे (7507505976) काम पाहणार आहेत. विद्यार्थी, पालक व जागरूक नागरिकांनी या संदर्भात नेमून दिलेल्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा व या जनहितार्थ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपस्तंभ प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!