Education : पंधरा हजार शाळा बंद होणार; मराठवाड्यातील २,१६३ शाळांचा समावेश
हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका
बंद होणार्या शाळांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर ३४७, नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०, बीड ६३३, लातूर २०२, धाराशिव १७८ अशा एकूण २,१६३ शाळांचा समावेश आहे. यामध्ये बहुतांश शाळा जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या शाळा आहेत.
परभणी : राज्यातील जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदांच्या आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३५२३ आहे. या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये मंगळवारी ४ जून रोजी प्रसिद्ध झाले आहे. नीरज आवंडेकर (अकोला) यांनी याबाबत मांडणी केली आहे. वृत्तामध्ये नमूद आहे की; सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो. या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ३४७, नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०, बीड ६३३, लातूर २०२, धाराशिव १७८, खान्देशमध्ये जळगाव १०७, धुळे ९२, नंदुरबार १९२; पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर ३४२, सातारा १४०, रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, कोल्हापूर ५०७, सांगली ४१५, पालघर ३१७; मुंबई उपनगरांतील ८६, मुंबई-२मधील ३१, ठाणे ४४१, रायगड १,२९५, पुणे १,१३२, पुणे १,१३२, नाशिक ३३१ आणि अहमदनगरमधील ७७५ शाळांचा समावेश आहे.
♦गावोगावी जनजागृती
ही परिस्थिती बदलण्यासाठी अकोल्यामध्ये शाळा बचाव समितीची स्थापना करण्यात आली. शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन, जनजागृती करीत आहेत. विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल, शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पातूरमध्येही दुसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांच्यासह शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गजानन हरणे, जयदीप सोनखास्कर, विजय कौसल, दिनेश काठोके, सुरेश मेश्राम, राजेश देशमुख, व शशिकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विभागनिहाय स्थिती : विदर्भ : ३,५२३, मराठवाडा : २,१६३, खान्देश : ३९१, पश्चिम महाराष्ट्र : ४,८३१, पुणे व मुंबई : ४,०९१ एकूण : १४,९९९
____________________________
Credit : Maharashtra Times