खासदार संजय जाधव : अठरापगड जातींसह मुस्लिम समाजाची भरघोस साथ; पण जातीय विष पेरल्याने ओबीसी दूर…महाविकास आघाडीकडून जाधव यांचा सेलूमध्ये जंगी सत्कार

खासदार संजय जाधव : अठरापगड जातींसह मुस्लिम समाजाची भरघोस साथ; पण जातीय विष पेरल्याने ओबीसी दूर…महाविकास आघाडीकडून जाधव यांचा सेलूमध्ये जंगी सत्कार

सत्काराला उत्तर देतांना खासदार संजय जाधव म्हणाले की; या निवडणुकीत अठरापगड जातींसह मराठा तसेच मुस्लिम समाजाने भरघोस मतदान केले. जरांगे फॅक्टरचा मोठा फायदाच झाला.ओबीसी समाजावरही मी नाराज नाही.‌ मागील दोन्ही निवडणुकीत ओबीसी समाजामुळेच मी खासदार झालो. या वेळी मात्र, जातीय विष पेरले गेल्याने ओबीसी समाज दूर राहिला याची खंत वाटते.

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांचा सेलू येथील महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी, ६ जून रोजी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार जाधव म्हणाले, की या निवडणुकीत अठरापगड जातींसह मुस्लिम समाजाने भरघोस साथ दिली.

अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे होते. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष तथा साईबाबा बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, रामनाना खराबे, माजी सभापती अशोक काकडे, विनायक पावडे, पुरुषोत्तम महाराज वालूरकर, सुधाकर रोकडे, पवन आडळकर, नामदेव डख, रणजीत गजमल, प्रकाश मुळे, शैलेश तोष्णीवाल, मनीष कदम, विठ्ठल काळबांडे, मिलिंद सावंत, योगेश कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार जाधव म्हणाले की; या निवडणुकीत अठरापगड जातींसह मराठा तसेच मुस्लिम समाजाने भरघोस मतदान केले. ओबीसी समाजावर मी नाराज नाही.‌ मागील दोन्ही निवडणुकीत ओबीसी समाजामुळेच मी खासदार झालो. या वेळी मात्र, जातीय विष पेरले गेल्याने ओबीसी समाज दूर राहिला. आडळकर म्हणाले, जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती भांबळे यांनी संपूर्ण सेलू-जिंतूर तालुका पिंजून काढण्यात आला. या वेळी साडेगावकर, खराबे, डख यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. विविध पक्ष व सामाजिक सांस्कृतिक संस्था, संघटनेच्या वतीने खासदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक अशोक काकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. कार्यक्रमासाठी निर्मला लिपणे, प्रभाकर सुरवसे, रावसाहेब रेंगे रघुनाथ बागल, पप्पू गाडेकर, अतुल सरोदे, सुरेश ढगे, सुधाकर पवार, विनोद तरटे, रमेश डख, परवेझ सौदागर, इरफान जमीनदार, शेख दिलावर, मजीद बागवान, मुजफर अली, नईम बागवान, लालू कुरेशी, नृसिह हरणे, मुश्ताक अहेमद, खाजा खान, मुन्नाभाई, शेख समीर, सतीश कलाल, रामेश्वर बहिरट, बालासाहेब रोडगे, शिवराम कदम, जीवन आवटे, विशाल देशमुख, शोभा इक्कर, सचिन शिंदे, शेख दिलावर, संभाजी पवार, गौस लाला, परवेज सौदागर, गौतम साळवे, वैभव वैद्य, अतुल डख, शेख मुस्ताक, सचिन शिंदे, अजीम कादरी, पंकज चव्हाण, विष्णू बागल, लिंबाजी कलाल आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीचाच झेंडा : जिंतूर मतदारसंघात मराठा, ओबीसी, आदीवासी, दलित विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचा महाविकास आघाडीच्या एकजुटीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे १३ हजारांवर मताधिक्य मिळाले. आगामी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार आहे. – विजय भांबळे, माजी आमदार, जिंतूर-सेलू

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!