NEET UG-2024 : विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये : सर्वोच्च न्यायालय; मात्र ‘या’ मुलांना फेरपरीक्षा देण्याची सरकारकडून मुभा

NEET UG-2024 : विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये : सर्वोच्च न्यायालय; मात्र ‘या’ मुलांना फेरपरीक्षा देण्याची सरकारकडून मुभा

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील हेराफेरीच्या आरोपांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांवर आज सुनावणी पार पडली. नीट परीक्षा आयोजित करणारी संस्था एनटीएकडून विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या वाढीव गुणांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. परीक्षा रद्द करुन फेरपरीक्षा घेण्याबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याचप्रकरणी सुनावणी पार पडली. विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, समुपदेशन सुरुच राहणार असून आम्ही ते थांबवत नाही. जेव्हा परीक्षा असते, तेव्हा सर्वकाही पूर्णतेने केले जाते. अशा परिस्थितीत, परीक्षा पूर्णपणे रद्द करणं योग्य नाही, अशी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी

केली आहे. त्याचवेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की, शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीने १५०० हून अधिक मुलांची फेरपरीक्षा घेण्याचं सुचवले आहे. हे लोक पुन्हा परीक्षेला बसले नाहीत, तर ग्रेस नंबर काढून टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो. नीट यूजी २०२४ मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ मुलांचे निकाल रद्द करणार असल्याची माहिती केंद्र सरकारने नीट घोळाबाबतच्या सुनावणी दरम्यान दिली आहे. निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच, पात्र विद्यार्थ्यांचे काऊन्सिलिंग, प्रवेश प्रक्रिया सुरुच राहणार असल्याचंही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, तुमची मागणी एनटीएनं मान्य केली आहे. ते ग्रेस मार्क काढून टाकत आहेत. ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग मिळाले आहेत, तेच पात्र असतील. तसेच, एनटीएने सांगितले की, २३ जून रोजी पुन्हा परीक्षा (१५६३) होईल, त्यानंतर समुपदेशन होईल. तिसऱ्या याचिकेतील पेपर लीकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर नाही. तसेच, निकाल ३० जूनपूर्वी येऊ शकतो.

दरम्यान, नीट परीक्षेच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ग्रेस मार्क्स, पुनर्परीक्षा आणि परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकांवर आज (१३ जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. दिल्ली हायकोर्टात काल (१२ जून) नीट परीक्षेबाबतही सुनावणी झाली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!