Sports : राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी ईश्वरी डोंबेची निवड
सेलू : भारतीय तलवाबाजी महासंघ व ओरीसा राज्य असोसिएशनच्यावतीने 16 वी मिनी व 5 वी चाईल्ड राष्ट्रीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 14 ते 17 जून 2024 दरम्यान कटक ओरीसा येथील स्पर्धेस बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलूची खेळाडू ईश्वरी उत्तम डोंबे हिची निवड झाली आहे. राज्य मिनी व चाईल्ड तलवारबाजी क्रीडा स्पर्धा दि. 5 ते 7 जून 2024 दरम्यान नाशिक येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेला नूतन संस्थेतील ईश्वरी उत्तम डोंबे व अवनी दिगंबर भिसे या खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र राज्य संघात स्थान प्राप्त केले. ईश्वर डोंबेची निवड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक संजय भुमकर यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झाल्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, सचिव डॉ.व्हि.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य एन.पी.पाटील, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर, जिल्हा सचिव डॉ. पांडुरंग रणमाळ, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, प्रशांत नाईक, भूषण देऊळगांवकर, अनुराग आंमटी, उत्तम डोंबे, मीरा शेटे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.