भारत टॅलेंट सर्च परीक्षा : सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे घवघवीत यश
वीस विद्यार्थी पात्र; चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत
सेलू : मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल 14 जून रोजी घोषित झाला असून येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल 90.22 टक्के लागला असून तब्बल 20 विद्यार्थी पात्र झाले आहेत, तर 4 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी नंदिका नरेश पाटील हीने 100 पैकी 80 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 10 वा क्रमांक प्राप्त केला आहे. प्रणिता रॉकी बनसोडे हीने 78 गुण मिळवून 12 वा, गौरी दिगंबर ताठे हीने 74 गुण मिळवून 14 वा क्रमांक प्राप्त झाला केला आहे. तर कुंदन नरेश पाटील या सहावीतील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 8 वे स्थान पटकावले आहे त्याला 150 पैकी 110 गुण प्राप्त झाले आहेत. शिक्षक कृष्णा पांचाळ, अमिता जवळेकर, शुभांगी भाग्यवंत, सर्जेराव सोळंके, प्रवीण चव्हाण व स्पर्धा परिक्षा विभाग प्रमुख योगेश ढवारे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
पात्र विद्यार्थी या प्रमाणे : आकांशा फड 2 री, ख़ुशी शिंदे 3 री, अंकिता फड 4 थी, गौरव वंजारे 4 थी, उमर पठाण 4 थी, जान्हवी नवघरे 4 थी, सोहम खरावणे 4 थी, स्वराली बुध्वन्त 4 थी, सायली धापसे 6 वी, पार्थ पाटणकर 6 वी, वैष्णवी लाटे 6 वी, संध्या मुसळे 7 वी, कृष्णा मुंडे 7 वी, श्रद्धा परदेशी 7 वी, ममता खरात 8 वी, सुमित सोळंके 8 वी
राज्यातून 2 री ते 8 वीचे 58 हजार 782 विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला होता. स्पर्धा परीक्षेच्या मुख्य समन्वयक शिक्षण मंत्रालायाच्या माजी सचिव प्राची साठे असून महाराष्ट्रातील राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तज्ज्ञ शिक्षक यांनी अभ्यासक्रम तयार केला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी, सचिव महेश खारकर, उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित बिनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, डॉ.प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर, विष्णू शेरे, ॲड.किशोर जवळेकर, रामेश्वर राठी, मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, सिद्धार्थ एडके आदींनी अभिनंदन केले आहे.