सेलूमध्ये गुणवंतांचा सत्कार, समाजभूषण पुरस्काराचे वितरण आज ; श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचा उपक्रम
सेलू : सेलू शहरातील श्रीभगवान परशुराम जन्मोत्सव समिती आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन शनिवारी, २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता श्री साई नाट्य मंदीर येथे करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते गोविंदभाऊ जोशी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून परळी वैजनाथचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रसिद्ध मूर्तिकार अश्विनी मंडलिक (पुणे) यांची उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक रणवरे रामराव सावंगीकर मामा, ह्रदयरोग तज्ञ डॉ.सुनील कुलकर्णी, लेखिका डॉ.जयश्री सोन्नेकर यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी यशवंत चारठाणकर (संगीत), देविदास सोन्नेकर (क्रीडा), प्रा.संजय पिंपळगावकर (अध्यात्म) यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समारंभासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे.