विविध परीक्षेतील गुणवंतांचा जिंतूरमध्ये सत्कार; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उपक्रम

विविध परीक्षेतील गुणवंतांचा जिंतूरमध्ये सत्कार; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उपक्रम

परभणी : जिंतूर व सेलू तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विविध उच्च पदावर निवड झालेल्या यशवंतांचा गुणगौरव सोहळा १६ जून रोजी जिंतूर येथे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय भांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा येथील फिनिक्स अकॅडमी संचालक प्राध्यापक नितेश कराळे उपस्थित होते. याप्रसंगी जिंतूर व सेलू तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी, नेट, सेट, जेईई व शासकीय सेवेत विविध पदावर निवड झालेल्या २५० गुणवंतांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राध्यापक कराळे यांनी १० वी १२ वी नंतर पुढे काय ? यावर तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली.
माजी आमदार भांबळे साहेब म्हणाले की; सर्वांची बुद्धिमत्ता एकसारखी नसून प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण निसर्गाने दिलेले आहेत. त्यामुळे एकमेकांचा हेवा न करता आपल्यातील गुण ओळखून करिअर निवडले पाहिजेत. पालकांनी देखील विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन शिक्षणासाठी मार्ग दाखवला पाहिजे. या वेळी विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, अशोक काकडे, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, शरद अंभूरे, रामेश्वर जावळे, मनीषा केंद्रे, बालाजी सांगळे आदींसह विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!