‘झेडपी’च्या शाळांना टेलिस्कोपचे वाटप; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा सेलूमध्ये उपक्रम

‘झेडपी’च्या शाळांना टेलिस्कोपचे वाटप; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा सेलूमध्ये उपक्रम

आमदार मेघना साकोर-बोर्डीकर यांच्या हस्ते वितरण

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी आपली उपक्रमशीलता अधिक समृद्ध करण्याची गरज आहे. भविष्यातील धोके लक्षात घेऊन, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण चळवळ तसेच आरोग्यासाठी मैदानी खेळाकडे लक्ष दिले गेले पाहिजे-आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

सेलू जि.परभणी : दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने सेलू तालुक्यातील निवडक २५ जिल्हा परिषद शाळांना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते टेलिस्कोप संचाचे गुरुवारी, २० जून रोजी वाटप करण्यात आले. नूतन विद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, मुख्याध्यापक संतोष पाटील, के.के.देशपांडे, भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष ॲड.दत्ता कदम, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, माणिक जाधव, विजय चिकटे, गजानन भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आमदार बोर्डीकर म्हणाल्या, ” ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, बुद्धीमत्ता, क्षमता आहेत. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील कुतूहल, जिज्ञासू वृत्ती जोपासण्यासाठी विविध शाळांमध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल क्लबची स्थापना झाली आहे. त्यासाठी टेलिस्कोप साधन निश्चितच उपयोगी ठरणार आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी युनिसेफने सुचविलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून १० जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचनालये स्थापन करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी आपली उपक्रमशीलता अधिक समृद्ध करण्याची गरज आहे. भविष्यातील धोके लक्षात घेऊन, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण चळवळ तसेच आरोग्यासाठी मैदानी खेळाकडे लक्ष दिले गेले पाहिजे.” प्रास्ताविक बाळू बुधवंत यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश बोरगांवकर यांनी केले. सुनीता काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. विष्णू डोंबे, पांडुरंग मुसळे, शरद ठाकर, रंजय बारडकर, दत्तात्रय रोकडे, अंजली पद्‌माकर, किरण राऊत, हरी घोटेकर, जनार्धन कदम, रमेश मरेवार, मनोज देगावकर, अरुण राऊत आदींनी परिश्रम घेतले.

…या शाळांना मिळाले टेलिस्कोप : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खवणे पिंपरी, रवळगाव, हिस्सी, बोरकिन्ही, रायपूर, निपाणी टाकळी, कान्हड, हातनूर, कुंडी, म्हाळसापूर, शिंदे टाकळी, झोडगाव, चिकलठाणा (खुर्द), आडगाव दराडे, धनेगाव, पारडी, ढेंगळी पिंपळगाव, लाडनांद्रा, सोन्ना, सिमनगाव, मोरेगाव, न्यू प्रा.शा.सेलू, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, प्रा.शा.उर्दू सेलू, जि.प.प्रशाला गुगळी धामणगाव आदी शाळांना टेलिस्कोप संचाचे वाटप करण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!