‘स्वराज्य गाथा शिवरायांची’ महानाट्याला सेलूकरांचा प्रतिसाद; स्थानिक कलावंतांना मिळाली अभिनयाची संधी
सेलू : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील स्थानिक कलावंतांनी ‘स्वराज्य गाथा शिवरायांची’ हे संगीतमय महानाट्य सोमवारी साई नाट्यमंदिरात सादर केले. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वतीने या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकाचे दिग्दर्शन अमर ठाकूर व सतीश आकात यांनी केले आहे. या नाटकात सेलू शहरातील शंभरपेक्षा जास्त कलावंतांना अभिनयाची संधी मिळाली आहे, असे श्री आकात यांनी सांगितले.