मानसिक आरोग्यासाठी योगसाधना आवश्यक : भगवान कुलकर्णी;केमापूरच्या शाळेत योगाचे धडे

मानसिक आरोग्यासाठी योगसाधना आवश्यक : भगवान कुलकर्णी;केमापूरच्या शाळेत योगाचे धडे

सेलू : स्पर्धेच्या युगात जोतो आपल्याच विश्वात धावपळ करत आहे.या धावपळीच्या युगात मानसाला योग्य आहार विहार मिळत नाही. त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगले रहात नाही.मानसाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित योगसाधना करणे आवश्यक आहे.नियमित योगसाधनेच्या माध्यमातून माणसाचे मानसिक आरोग्य चांगले रहायला मदत होते असे प्रतिपादन योग अभ्यासक भगवान कुलकर्णी यांनी
जागतिक योगदिना निमित्ताने ता.२१ शुक्रवारी रोजी (ता.सेलू) केमापूर येथे केले. यावेळी त्यांनी योगासने प्राणायामाची प्रात्यक्षिके विद्यार्थींकडून करून घेतली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण आष्टकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक जे.एस.देशमुख हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दगडोबा माघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद ठाकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रणिता गाडे,प्रभावती घुगे, अंगणवाडी ताई कल्पना पालवे,शकुंतला आंधळे यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!