आंतराष्ट्रीय योग दिन : नूतन विद्यालय, महाविद्यालयात योग दिन उत्साहात; प्रात्यशिक्षकांत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग
सेलू : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नूतन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ४०० विद्यार्थीचा सहभाग राहिला. योगातून शरीर शुध्द होते. योगासन करणे शरीराला आवश्यक आहे. नियमित योग व व्यायाम करणे आवश्यक आहे, असे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांनी या वेळी सांगितले. तहसीलदार कार्यालय, गटविकासधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, नूतन महाविद्यालय सेलू व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजिण्याच आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयप्रकाशजी बिहाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, प्राचार्य यु.सी. राठोड,योगाचार्य डी. डी. सोन्नेकर, जिल्हा सचिव योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी, क्रीडा संयोजक गणेश माळवे, मुख्याध्यापक रवींद्र पाठक रामप्रसाद गोरे, बाळासाहेब आळणे, प्रा. प्रविण सोनवणे,के के कदम हे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी योग दिनाच्या प्रोटोकॉल नुसार देविदास सोन्नेकर यांनी सेलू शहरातील सहा शाळेतील 400 विद्यार्थ्यांचा योगाभ्यास घेतला. विभागीय योगासन स्पर्धा छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या योगासन स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिक्षक या पदवी अभ्यासक्रमात यशस्वी झाल्याबद्दल प्रा.सुष्मिता भरदम, प्रा.सुषमा सोमाणी यांचा सत्कार करण्यात आला. नूतन योगा सेंटरच्या योगपटूंनी उत्कृष्ट योगासन प्रात्यक्षिक केले. प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी केले आभार के .के. कदम यांनी तर सूत्रसंचालन प्रा. नागेश कान्हेकर यांनी केले.
नूतन विद्यालयात कार्यक्रम
नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील यांनी योगासनाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, काशीनाथ पल्लेवाड आदींची उपस्थिती होती