राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

परभणी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जजयंतीनिमित्त जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालयात बुधवारी, २६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, जनार्धन विधाते, जिवराज डापकर, दत्तु शेवाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते. सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी गंगाधर गु़ंजकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव भालेराव उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाव्यात. नवनवीन तंत्रज्ञान विकसित करुन तरुणांच्या हाताला काम देण्याची नितांत गरज आहे, असे मत गंगाधर गुंजंकर यांनी यावेळी व्यक्त केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल महादेव आगजाळ यांनी केले. अनिरुद्ध टाके यांनी आभार मानले. सेलू येथील नूतन विद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, सुधीर जोशी, डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले.

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!