सेलूतील जैन मंदिरात गुरुभक्ती सोहळा उत्साहात; विविध कार्यक्रम
सेलू जि.परभणी : आचार्य श्री तुलसी यांच्या २८ व्या महाप्रयाण दिनानिमित्त सेलूतील नेमिनाथ दिगांबर जैन मंदिराच्या प्रांगणात गुरुभक्ती गुरुभक्ती सोहळा उत्साहात पार पडला. आचार्य श्री महाश्रमणजी यांचे प्रबुद्ध शिष्य, डॉ. मुनीश्री पुलकित कुमारजी, मुनीश्री आदित्य कुमारजी यांची प्रमुख उपस्थिती होती. नवकार महामंत्राच्या उच्चारणाने सुरुवात झाली. मंगलाचरन धनराज गादिया यांनी केले. नचिकेटा मुनी, आदित्य कुमार यांनी गीत, विधान, डॉ.मुनिश्री पुल्कित कुमार यांनी विनयाजंली समर्पित केली. गौतम सांखला, भाग्यश्री लोढा, रीना गादिया, हेमंत आचलीया, मंजू सांखला, सचिन आंचलिया आणि महिला मंडल सेलू आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन नामिता आंचलिया यांनी केले.