‘आंतरभारती’च्या सेलू शाखाध्यक्षपदी महादेव आगजाळ; कीर्ती राऊत सचिव

‘आंतरभारती’च्या सेलू शाखाध्यक्षपदी महादेव आगजाळ; कीर्ती राऊत सचिव

सेलूमध्ये आंतरभारतीची शाखा स्थापन, उपाध्यक्षपदी प्रमोद देशमुख, डॉ.काशिनाथ पल्लेवाड

सेलू : पूज्य साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती या संस्थेच्या आजीव सभासदांच्या बैठकीत सेलू शाखेच्या अध्यक्षपदी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल महादेव आगजाळ, तर सचिवपदी कीर्ती राऊत, कार्याध्यक्षपदी बाबासाहेब हेलसकर, उपाध्यक्षपदी प्रमोद देशमुख, डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांच्यासह कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

राष्ट्रीय उपाध्यक्ष संगीता देशमुख (वसमत) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी, २९ जून रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात ही बैठक पार पडली. याप्रसंगी आंतरभारतीचे संयोजक संजय माचेवार, शिवाजीराव सूर्यवंशी (वसमत), ग्रंथपाल महादेव आगजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी संगीता देशमुख यांनी आंतरभारतीच्या कार्याची तसेच विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती देत मार्गदर्शन केले. संजय माचेवार यांनी आंतरभारती दिवस व भारत दर्शन यात्रा उपक्रमाबाबत माहिती दिली.

यावेळी आंतरभारती सेलू शाखेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष महादेव आगजाळ, कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर, उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, सचिव कीर्ती राऊत, सहसचिव सतीश कुलकर्णी, सच्चिदानंद डाखोरे, कोषाध्यक्ष कैलास मलवडे, सदस्य – सर्जेराव लहाने, विजय वायाळ, भालचंद्र गांजापूरकर, भगवान पावडे, सुभाष मोहकरे, डॉ.शरद ठाकर, विलास शिंदे, मंताजी ढाकरे, कल्पना वानरे, स्वाती हेलसकर आदींचा समावेश आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष महादेव आगजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी आभार मानले. बैठकीला आजीव सभासदांची उपस्थिती होती.

यावेळी संगीता देशमुख यांनी आंतरभारतीच्या कार्याची तसेच विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती देत मार्गदर्शन केले. संजय माचेवार यांनी आंतरभारती दिवस व भारत दर्शन यात्रा उपक्रमाबाबत माहिती दिली.अध्यक्ष महादेव आगजाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!