आदित्य फार्मसी,अपूर्वा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या तंत्रनिकेतन व फार्मसी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या अपूर्वा पॉलिटेक्निक आणि आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तंत्रनिकेतन परीक्षेत शेख झाहेद ८४.५० टक्के, गोकर्णा गणगे ८२.३८ टक्के, तर अश्विनी चाळक हीने ८०.१३ टक्के गुण घेऊन गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर फार्मसीच्या परीक्षेत गायत्री दांडगे ७७.४०, तन्वी वडे ७२.२०, तर कोमल ७२ टक्के गुण मिळवून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला.
तंत्रनिकेतन परीक्षेत महेश पारधे, लष्करी फयाजखान, प्रतीक्षा ठोंबरे, अभिषेक जायभाये , शेख अबू सुफियान, सोनी मगर ज्ञानेश्वर राठोड, पुष्पांजली गंधाला, विनायक बरसाले, वैष्णवी काटकर शेख मुस्ताफिज, अंजली पठाडे, श्रेयश आर्दड, विवेक भारती, शिल्पा गुळवे, पूजा मुळे, विजय सावंत, महेश गरड, माधव मोहिते, राहुल शेळके आदी विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य अशोक बोडखे, प्रा.गजानन जाधव, श्याम वाघ, संतोष करांडे आदींच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले.