कृषी दिनानिमित्त वाकीमध्ये वृक्षारोपण
सेलूतील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम
सेलू : सेलू् येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांमार्फत सेलू तालुक्यातील वाकी येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून एक जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायतराज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते ‘पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा’ होते, असे यावेळी कृषीदूतांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रॅली काढण्यात आली. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.ए.ए. चव्हाण, समन्वयक डॉ.एन.एन. चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा.ए.पी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमासाठी अभिषेक खंदारे, राकेश कोंपेली, सुमित लहाने, चक्री लेकिरेडी, अनिरुद्ध माने, तर इरळदमध्ये यांनी परिश्रम घेतले. या वेळी सरपंच अशोक नाईकनवरे, मुख्याध्यापक, विद्यार्थी व शेतकर्यांची उपस्थिती होती.