नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम; डॉ.संजीव देशमुख यांची उपस्थिती

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम; डॉ.संजीव देशमुख यांची उपस्थिती

सेलू : सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा ८५ वा वर्धापन दिन आणि दलितमित्र श्रीरामजी भांगडियाजी यांच्या ४७ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी, ३ जुलै रोजी दुपारी चार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा दिल्ली आयआयटीतील प्राध्यापक डॉ.संजीव गोविंदराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी चौथी ते पदवी परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. नूतन विद्यालयाच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात दुपारी चार वाजता कार्यक्रम आहे. उपस्थित राहावे आहे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरुजी, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी आणि संस्था कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा : सेलूच्या भूमिपूत्राचा सन्मान : डॉ.संजीव देशमुख यांची शासकीय अभियांत्रिकी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!