पाऊसपाणी : महिनाभरात परभणी जिल्ह्यात १९४ मिलीमीटर बरसला

पाऊसपाणी : महिनाभरात परभणी जिल्ह्यात १९४ मिलीमीटर बरसला

पाऊसपाणी  महिनाभरात परभणी जिल्ह्यात १९४ मिलीमीटर बरसला

परभणी : परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रविवारी दुपारी आणि रात्री पावसाने सर्वदूर हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना जीवदान मिळाले आहे. सोमवारी आणि मंगळवारीही सायंकाळी काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान परभणी जिल्ह्यात महिनाभरात सरासरी १९४ मिलीमीटर पाऊस बरसला आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळात सर्वाधिक ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मोरेगाव मंडळात ३८.५, परभणी तालुक्यातील झरी मंडळात ४४.८, दैठणा ३६.३ मिलिमीटर पाऊस झाला‌. गंगाखेड तालुक्यातील महातपुरीमध्ये २५, जिंतूरमध्ये ५२.३, सावंगी २८.८, बामणी २९.८, बोरी ३६, आडगाव ३३.३, चारठाणा २२.३, वाघी धानोरा ३२.८, दुधगाव ३६.३, पूर्णा तालुक्यातील ताडकळसमध्ये २५.५, लिमला २८.३, चुडावा २४.३, पालममध्ये २९.५, रावराजूर ३४.३ मिलिमीटर पाऊस झाला. तर मंगळवारी सकाळी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात एक जूनपासून मंगळवारी सकाळपर्यंत सरासरी १९४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!