‘आम्ही सेलूकर’ ग्रुपच्यावतीने ६० वृक्षांची लागवड; वृक्षसंवर्धनासाठीही पुढाकार 

‘आम्ही सेलूकर’ ग्रुपच्यावतीने ६० वृक्षांची लागवड; वृक्षसंवर्धनासाठीही पुढाकार 

सेलू जि.परभणी : ‘आम्ही सेलूकर’ सामाजिक ग्रुपच्यावतीने सेलू येथील नूतन महाविद्यालयासमोरील बास्केटबॉल मैदानात ६० देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून वृक्षसंवर्धनासाठीही प्राध्यानाने ग्रुपचे सदस्य लक्ष देणार आहेत.

वृक्षारोपणप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.यु.सी.राठोड प्राध्यापक दयानंद जामगे आदींची उपस्थिती होती. वड, पिंपळ, चिंच, गुलमोहर, जांभूळ, सिसम आदी देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्णय ग्रुपकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी शेणखत व जैविक खताचा पहिला डोस वृक्षांना देण्यात आलेला आहे. तसेच संरक्षणासाठी ट्री गार्ड, बांबूकाठी, तार, खड्डे खाण्यासाठी जेसीबी, पाणी टँकर आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमासाठी आम्ही सेलूकर सामाजिक ग्रुपचे सदस्य कैलास लाटे, संजय पावडे, अमोल मोगल, विक्रांत पाटील, संदीप लहाने, ॲड.कृष्णा शेरे, सुमित भरदम, डॉ.सुदर्शन मालाणी, डॉ.परेश बिनायके, डॉ.दिगंबर घोडके, डॉ.सचिन काळे, राहुल सरकटे, जगदीश तोतला, भारत एडके, सुनील राठोड, रविराज ताठे, अनंत दिग्रसकर, संदीप कुंडीकर, विशाल बुरेवार, अविनाश कांबळे, अभय भंडारी, शंभू काकडे आदींनी पुढाकार घेतला आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!