बाप समजावून घेतांना : वसंत हंकारे यांचे बुधवारी व्याख्यान
सेलू येथील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम
सेलू : सेलू येथील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने युथ स्पीकर आणि महाराष्ट्रातील विद्यार्थीप्रिय प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे ‘बाप समजावून घेताना…!’ या प्रेरणादायी व्याख्यानाचे बुधवारी, ३ जुलै रोजी सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. श्री साई नाट्य मंदिरात व्याख्यान आहे. मुलामुलींनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.