दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांना अभिवादन; सेलूतील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सेलू : सेलू शहराचे शिल्पकार दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या ४७ व्या स्मृतीदिनानिमित्त नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने नूतन विद्यालय परिसरातील पुतळ्याजवळ मंगळवारी अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, सीतारामजी मंत्री, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.यु.सी.राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका एन.डी.पाटील, सुखानंद बेंडसुरे, डी.डी.सोन्नेकर, के.के.देशपांडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, रघुनाथ बागल, अशोक उफाडे, दिलावर शेख, विठ्ठल काळबांडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.