विधानपरिषद : राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषद : राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

परभणी : महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या अर्थात विधान परिषद सदस्य निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी, दोन जुलै रोजी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषी मंत्री धनंजय मुंडे, परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. पक्षाच्या वरिष्ठांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचा मन: पूर्वक आभारी आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तडीस नेण्याचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया राजेश विटेकर यांनी दिली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!