लेकरांचे डोळे पाणावले : वसंत हंकारे यांच्या भावस्पर्शी व्याख्यानाला मोठा प्रतिसाद
सेलूतील अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम
माजी आमदार विजय भांबळे म्हणाले, ” विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून दूर राहावे. कुठल्याही प्रकारचे दडपण घेऊ नये. आत्मविश्वासाने आणि मनमोकळेपणाने शिक्षण घ्यावे.”
सेलू जि.परभणी : सेलू येथील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने बुधवारी, ३ जुलै रोजी आयोजित प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या ‘बाप समजावून घेताना’ या भावस्पर्शी व्याख्यानाने उपस्थित शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींचे डोळे अक्षरशः पाणावले.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे होते. याप्रसंगी उद्योजक रामप्रसाद घोडके, संयोजक अशोक काकडे, प्रफुल्ल गिल्डा, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, संतोष कुलकर्णी, शिलाताई काकडे, निशा पाटील, मनीष बोरगावकर, रहीमखाँ पठाण, शेख रहीम, अशोक उफाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्री.हंकारे म्हणाले, ” शाळेच्या चार भिंतीत चारित्र्य घडते. ते माणूसपण आणि आईबापाचे कष्ट हरवत चालल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे लेकरांच्या सुखासाठी जगणारे आईबाप कळले पाहिजेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ते जिवंत असतांनाच होणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या वयात शिक्षणच घ्या. मार्क कमी पडले तरी हताश, निराश होऊ नका. आणि आयुष्यात आईबांपाची मान ताठ राहील अशीच वागणूक ठेवा ” माजी आमदार भांबळे म्हणाले, ” विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून दूर राहावे. कुठल्याही प्रकारचे दडपण घेऊ नये. आत्मविश्वासाने आणि मनमोकळेपणाने शिक्षण घ्यावे. याप्रसंगी एनडीएसाठी निवड झाल्याबद्दल ऋतुराज व श्रीराज रमेश नखाते या भावंडांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संयोजक अशोक काकडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले.
वल्लभजी लोया, संतोष पाटील, सिद्धार्थ एडके, नाईकनवरे, प्रल्हाद कान्हेकर, दत्तूसिंग ठाकूर, विठ्ठल काळबांडे, परवेज सौदागर, प्रदीप शिंदे, सचिन धापसे, विजय काकडे, गौतम साळवे, मजिद बागवान, शाम मुंढे आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, व्याख्यान ऐकण्यासाठी बाल्कनीसह श्री साई नाट्य मंदिरात तुडुंब गर्दी झाली होती. व्यासपीठावरही विद्यार्थिनींनी व्याख्याते वसंत हंकारे यांना गराडा घातला होता. सभागृहाबाहेरही व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.