सोमदत्त मगरचे सीए परीक्षेत यश; विविध सर्वस्तरातून कौतुक

सोमदत्त मगरचे सीए परीक्षेत यश; विविध सर्वस्तरातून कौतुक

सोन्ना सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी व वारकरी कुटुंबातून उच्च शिक्षण घेऊन यश संपादन करून सोमदत्त मगर यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सोमदत्तच्या आई-वडीलांचा शेती व्यवसाय तर आहेच. परंतु मगर परिवाराला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे, मागील अनेक वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या पायी दिंडी क्रमांक १११ चे नेतृत्व दत्तराव महाराज सोन्नेकर करतात. पांडुरंगाची निस्सीम भक्ती करणारे कुटुंब म्हणून मगर परिवार पंचक्रोशीत सर्व परिचीत आहे.

सोमदत्त मगरचे सीए परीक्षेत यश; विविध सर्वस्तरातून कौतुक

सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील सोन्ना येथील सोमदत्त दत्तराव मगर यांनी चार्टर्ड अकाउंन्टन्सी (सीए) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अरविंद निर्मळ यांचे सोमदत्तला मार्गदर्शन लाभले. सोमदत्तचे वडील शेतीनिष्ठ शेतकरी असून कुटुंबाला वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. सोमदत्तचे माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल शाळेत, तर उच्च माध्यमिक शिक्षण नूतन महाविद्यालयात झालेले आहे. या यशाबद्दल पांडुरंगराव मगर, गोविंदभाऊ जोशी, श्रीबल्लभजी लोया, मोकिंदराव झोडगावकर, संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, संजय मगर, सुनिल डख, प्रा.विनायक मगर, प्रा.डीगांबर मगर, शरद मगर, राजेभाऊ मगर,संजय वाघ, भरत रोडगे, न्यू हायस्कूलसह सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!