आषाढी एकादशी : ‘उत्कर्ष’ चा पालखी सोहळा सेलूमध्ये रंगला
सेलू जि.परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या उत्कर्ष विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात झाला. विद्यार्थी,कर्मचारी, शिक्षक पारंपारिक वारकऱ्याची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे व डॉ.सविता रोडगे यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. डॉ. रामराव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे मुख्याध्यापक कैलास ताठे जिज्ञासा बालविहारच्या शिंदे, परळीकर, टाके आदींची उपस्थिती होती. मुलांनी अभंग, गवळणी, भारुडाच्या माध्यमातून वृक्षरोपणाचा संदेश दिला.