चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह रोख रक्कम लंपास

चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह रोख रक्कम लंपास

सेलू येथील नूतन महाविद्यालय रोडवरील घटना, अज्ञात आरोपीविरूद्द गुन्हा दाखल

सेलू जि.परभणी : रस्त्यामध्ये अडवून चार ते पाच चोरट्यांच्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवून ब्रॅंडेड कंपनीचे मोबाईल व काही रोख रक्कम लंपास केल्याच्या दोन घटना सेलू (जि.परभणी) येथे बुधवारी, १७ जुलैरोजी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास घडल्या आहेत. या प्रकरणी १८ जुलै रोजी सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात चार आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या बाबत करणसिंग टिक्का साऊंद या हॉटेल कामगाराने फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून साक्षीदार व फिर्यादी सेलू शहरातून किराणा सामान घेऊन नूतन महाविद्यालय रोडने पायी परत जात होते. त्यावेळी महावितरण कार्यालयासमोर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदाराला रस्त्यात अडवून एका आरोपीने गळ्याला चाकू लावला. मोबाईल दे, असे म्हणत १८ हजार रुपये किमंतीचा मोबाईल हिसकावून घेतला. अन्य आरोपीने रोख एक हजार रूपये खिशातून काढून घेतले. तर रात्री आठ वाजता साक्षीदार प्रवीण दत्ता पारवे हे दुचाकीवरून देऊळगाव (गात )कडे  जात असतांना याच आरोपीनी कसुरा नदीच्या पुलाजवळ चाकूचा धाक दाखवून रेडमी कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीसह मोबाईल चोरींच्या घटनांत वाढ होत असून चोराट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!