हातनूर येथील श्री नागनाथ मंदिराला अभ्यास पथकाची भेट
परभणी : परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मुख्यालय येथील अभ्यास पथकाने सेलू तालुक्यातील प्राचीन श्री नागनाथ भगवान मंदिर येथे बुधवारी, २४ जुलै रोजी भेट देऊन मंदिर परिसर तसेच बारवाची पाहणी केली. पथकामध्ये पोलीस निरीक्षक श्री.पवार, श्री.देशपांडे, श्री लहाने, श्री.जाधव, श्री.बुधवंत यांचा समावेश होता. यावेळी समितीच्या वतीने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष बालासाहेब आंधळे, सदस्य प्रभाकर ठाकरे, दत्तराव आंधळे, मुंजाजी राऊत, बाबासाहेब डुकरे, बालासाहेब शेळके, विष्णू सज्जन, निवृत्ती साखरे, राजेभाऊ आंधळे, प्रल्हाद ठाकरे, रखमाजी गाडे, सुभाष गाडे, अनिल बेटकर, बाबासाहेब टाले, बाबासाहेब आंधळे, श्याम आंधळे, रामेश्वर आंधळे, सखाराम शेवाळे, पोलीस पाटील रामचंद्र पारवे आदींसह नागरिक उपस्थित होते.