रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण अभियान; विद्यार्थी करणार वृक्षांची देखभाल
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.संजय रोडगे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. लावण्यात आलेल्या वृक्षांची विद्यार्थी देखभाल करणार आहेत. देखभाल करून त्याला वाढवणार असल्याचे सांगितले. सद्यःस्थितीत वृक्षरोपण ही काळाची गरज असल्याचे सांगून वृक्षारोपण चळवळ प्रेरणा देणारी आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षारोपणाने सुरक्षित करता येणार असल्याची भावना डॉ.रोडगे यांनी यावेळी व्यक्त केली.