सरकारच्या योजना प्रगतीसाठी दिशादर्शक : आमदार मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन; देऊळगाव गात येथे माहिती शिबिर उत्साहात
परभणी : महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या विविध योजनांसह महायुती सरकारचे इतरही निर्णय व योजना महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप ठरत आहेत, असे मत जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण, वयोश्री योजना इत्यादी योजनांच्या माहिती शिबिरात आमदार बोर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली ताठे, गणेश काटकर अशोकराव शेलवाडीकर, त्र्यंबक आप्पा कदम, शिवाजीराव कदम, तात्या कदम, दत्ता आबा कदम आदींची उपस्थिती होती. योजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी. तसेच एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये. यादृष्टीने शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी गणेश काळे, शिवाजीराव कदम, संतोष सोनटक्के, दत्तराव तांबे, सुदर्शन हातकडके, नारायण कदम, विशू मांडाखळीकर, महादेव आप्पा पाचलेगावकर, बाबा शिलार, काशिनाथराव हातकडके, सचिन कदम, चेतन कदम, लक्ष्मण काळे आदींनी परिश्रम घेतले. जिंतूर येथेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी कार्यशाळा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर होत्या. उपविभागीय अधिकारी संगीता सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, तहसीलदार श्री.सरोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेला महिला, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.