शिक्षण सप्ताह : नूतन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

शिक्षण सप्ताह : नूतन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

सेलू जि.परभणी : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण सप्ताहाअंतर्गत गुरुवारी सेलू येथील नूतन विद्यालयात सांस्कृतिक दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर यांच्या मार्गदर्शनात २२ जुलैपासून अध्ययन-अध्यापन साहित्य तयार करणे, मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस, क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गुरूवारी, २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिनाच्या निमित्ताने शिक्षिका शिल्पा बरडे यांच्या संकल्पनेतून सुरेश हिवाळे यांचे दिग्दर्शित’ वृक्ष हेच जीवन ‘ ही नाटीका विद्यार्थ्यांनी सादर केली. सिद्धी शिंदे, सृष्टी कटारे, दिपाली इंगळे, अंजली आवटे, सिद्धी शेरे, संग्राम टाक, हरदास विहिरकर, भागवत बुचाले, सान्वी हेलसकर, गौरी वैद्य या विद्यार्थ्यांनी नाटिकेत सहभाग घेतला. चित्रकला, वक्तृत्व, कथाकथन, समूहनृत्य, समूहगायन , वैयक्तिकनृत्य या कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाले. २८ जुलैरोजी समारोप आहे. क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.काशिनाथ पल्लेवाड, आर.डी.कटारे, सुनील तोडकर, अतुल पाटील, संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, उमेश क्षीरसागर यांच्यासह शिक्षकांनी उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!