सतीश बाहेती यांचा सेवागौरव; सेलूमध्ये कार्यक्रम
सेलू जि.परभणी : सेलू येथील रहिवाशी आणि महावितरणचे उदगीर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश बाहेती २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. याबद्दल सेलू येथील गुलमोहर कॉलनीत अलफ्लाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने बाहेती यांचा सेवा गौरव करण्यात आला. यावेळी बाहेती यांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा उपस्थितींनी गुणगौरव केला. हजयात्रेवरून परतलेल्या हाजी रफिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हाजी शफिक अली खान, वीज अभियंता अनिस कुरेशी, हाजी युनूस भाई, शेख महेमूद, निसार पठाण, शेख मौजम, रशीद खान इजींनिअर, शेख हारूण, शेख शमशोद्दीन, शेख इमामोद्दीन, शेख असगर, जकी सिद्दीकी, जावेद घौरी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार शेख महेमूद यांनी मानले.