अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन : कवी संमेलन, बालवाचकांची गटचर्चा रंगली

अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन : कवी संमेलन, बालवाचकांची गटचर्चा रंगली

अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन : कवी संमेलन, बालवाचकांची गटचर्चा रंगली

परभणी : परभणी येथे आयोजित अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनात बालकवींनी सादर केलेल्या स्वरचित कवितांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर ‘मी वाचलेले पुस्तक’ यावरील गटचर्चेमध्ये १९७ बालवाचकांनी सहभाग घेतला. 
कवी संमेलनात अनुष्का भदर्गे हीने सादर केलेल्या ‘चंद्रावरची परी एकदा जमिनीवर आली, येता येताच ती मला फुले देऊन गेली.’ कविता बालवाचकांना परीच्या विश्वात घेऊन गेली. सोमेश्वर अंभोरे याने ‘पाऊस आला पाऊस आला, पाऊस पडला गार गार’ कविता साभिनय सादर केली. ‘हदगाव प्रशालेची प्रियांका यादव हीने आजीचे महत्त्व सांगणारी ‘आईची जागा घेणारी माझी माय आहेस, माझ्यासाठी जणू अपंगाचा पाया आहेस’ ही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
‘माझ्यासाठी तूच एक अनमोल ठेव आहे, काय बोलू तुझ्यावर तूच माझा देव आहे’ या निशिगंधा मस्के या विद्यार्थिनीने सादर केलेल्या कवितेसह अनुराधा चव्हाण, प्राजक्ता बडवणे, वैदही सावंत, मानसी सूर्यवंशी, प्रनिधी कांबळे आदी बालकवींच्या स्वरचित बालकवितांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला. बालकवी संमेलनात २५ बालकवींनी सहभाग घेत आपल्या भावविश्वातील शब्दांना कल्पनेचे पंख लावून काव्य विश्वात भरारी घेतली.

‘मी वाचलेले पुस्तक’ यावर रंगली चर्चा

परभणी : अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने आयोजित केलेल्या बालवाचक साहित्य संमेलनात ‘मी वाचलेले पुस्तक’ यावर बालवाचकांनी गटागटांनी चर्चा केली. १९७ बालवाचकांनी गटचर्चेमध्ये सहभाग घेतला. वाचलेल्या पुस्तकातील आवडलेला भाग, तो का आवडला? अपरिचित शब्द, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, पुस्तकांची बांधणी अशा अनेक मुद्द्यावर आपली मते व्यक्त केली. आपापसात चर्चा केली. वर्षभरात त्याने अनेक पुस्तके वाचली होती. त्यातील आवडणाऱ्या एका पुस्तकावर जिल्हाभरातून जमलेल्या बालवाचकासमोर गटागटामध्ये ते अभिव्यक्त झाले. एकमेकांची मते पुस्तकाविषयी त्यांना ऐकता आली. अनेक पुस्तकांची ओळख झाली. बालवाचकांनी गटागटात शब्द सजवा, शब्द सोबती इत्यादी भाषिक खेळाचाही आनंद घेतला. ज्यामुळे त्यांच्या शब्दसंपत्तीत भर पडली. मी वाचलेले पुस्तक यावर चर्चेसाठी शिक्षक समन्वयकांनी बालवाचकांना मार्गदर्शन केले. त्यांचे निरीक्षण करून योग्य त्या ठिकाणी सूचना दिल्या. एकूणच पुस्तकांचा रसा स्वाद घेऊन बालवाचकांनी वाचन साजरे केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!