योगासन स्पर्धा : परभणी जिल्ह्यातील २७ योगपटुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

योगासन स्पर्धा : परभणी जिल्ह्यातील २७ योगपटुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

संगमनेर येथे १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धा

परभणी : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती संलग्नित, परभणी जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनआयोजित परभणी जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी शनिवारी, २७ जुलैरोजी सेलू येथील नूतन विद्यालयात पार पडल्या. यामध्ये विविध गटातून परभणी जिल्ह्यातील २७ योगापटुंची संगमनेर येथे १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक अंभोरे, त्वचारोग तज्ञ डॉ.शैलेश मालाणी, संदीप बोकन, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, प्रा.नागेश कान्हेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून माधव देशपांडे, शिल्पा पिंपळे, कृष्णा होलिया, सोमनाथ महाजन, सुष्मा सोमाणी, सुष्मिता भरदम, बाळू बुधवंत उपस्थित होते. प्रास्ताविक स्पर्धा संयोजक तथा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा सचिव डी.डी.सोन्नेकर यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, तर प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : सब ज्युनिअर मुली : प्रथम-सृष्टी सोळंके, द्वितीय-सानवी झाल्टे, तृतीय – देवांशी टेळकीकर, जूनियर मुली : प्रथम-श्रुती खंदारे, द्वितीय-श्रेया घिके, तृतीय-पौर्णिमा देशमुख, सीनियर मुली :प्रथमअंकिता भोकरे , सब जुनिअर मुले : प्रथम-मल्हार काटे, द्वितीय-तथास्तु रकटे, तृतीय-पद्मनाभ काटे, जूनियर मुले : प्रथम-नचिकेत आळणे, द्वितीय-स्वराज काकडे, तृतीय-शिवप्रेम काटे, सीनियर मुले : प्रथम-वासुदेव सोन्नेकर, सीनियर ए संघ : प्रथम-रामा गायकवाड, द्वितीय-रोहित खत्री, तृतीय ज्ञानेश्वर काकडे, सीनियर बी महिला : प्रथम-अनुजा सुभेदार, द्वितीय-सुष्मिता भरदम, तृतीय-संगीता दाभाडे, सीनियर सी पुरुष : प्रथम-लक्ष्मीकांत फटाले, द्वितीय-प्रशांत घिके, तृतीय-पंडित दाभाडे, सीनियर सी महिला : प्रथम-मंजुषा जामगे, द्वितीय-रुक्मिणी लटपटे, आर्टिस्टिक योगा वैयक्तिक सब जूनियर मुली : प्रथम-मनस्वी सोनी, जूनियर मुली : प्रथम-श्रुती खंदारे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!