नूतन कन्या प्रशालेत तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात

नूतन कन्या प्रशालेत तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात

सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा सेलू, स्वर्गीय सौ.दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी,२९ जुलैरोजी आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा नूतन कन्या प्रशालेत उत्साहात पार पडली. ही कथाकथन स्पर्धा प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित केली जाते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका निशा पाटील होत्या. उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, स्पर्धेचे परीक्षक एस.डी.पाटील, प्रमोद देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत सेलू तालुक्यातील १८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत अनेक संस्कारक्षम, बोधपर बोधकथा सांगत श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात कै.दुर्गाताई कुलकर्णी आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थना रेणुका अंबेकर यांनी सादर केली. प्रास्ताविक दत्तराव घोगरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील मोगल, वैशाली चव्हाण, शशिकांत देशपांडे, यशोदा चव्हाण, रूपाली पवार, सुरेखा भांबळे, प्रणिता सोलापूरे, सोनाली कुबरे, सुरेश हिवाळे यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!