शिवा संघटना : पोलिस दलातील आरती सूर्यवंशी यांचा सेलूमध्ये सत्कार
सेलू : पोलीस दलात नव्याने रुजू झालेल्या आरती नारायणअप्पा सूर्यवंशी यांचा शिवा संघटना शाखा सेलूच्या वतीने सत्कार सोमवार, २९ जुलै रोजी सेलू शहरातील अक्षदा मंगल कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवा कर्मचारी संघाचे तालुका अध्यक्ष कैलासअप्पा मलवडे म्हणाले की; आरतीच्या यशामध्ये आई-वडील व कुटुंबीयांचे अपार कष्ट कामी आल्याचे नमूद करुन आगामी जीवनात आरती यांची उत्तरोत्तर पदोन्नती व्हावी. त्यांनी उज्ज्वल यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा. शिवा सोशल मिडीयाचे राज्य पदाधिकारी प्रदीप डफुरे ह्यांनी अत्यंत गरीब व होतकरु कुटूंबातून अनेक अडचणींना समोरे जात गणेश सूर्यवंशी शिवा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असतात. त्याच प्रमाणे त्यांची बहीण आरती देखील आपल्या प्रशासकीय सेवेत हिरीरीने सहभागी राहून आपल्या कार्याची चुणूक दाखविल्या शिवाय राहणार नाही अशा आशयाची भावना व्यक्त केली. याप्रसंगी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष निजलींगअप्पा तरवडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक दायीत्व सर्वोपरी लक्षात ठेवून आपण कार्यरत राहू असे मत आरती सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात शिवा संघटनेचे परभणी जिल्हा उपप्रमुख शिवकुमार नावाडे यांनी आरतीचे यश वीरशैव-लिंगायत समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन बालासाहेब क्षीरसागर यांनी केले. तर सुजीत मिटकरी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिवा शहरप्रमुख प्रकाश साखरे, रामदास पाटील, दगडया स्वामी, बबन अप्पा झमकडे, गुरूबसप्पा पंचगले, नवनाथ सोनटके, सुनील नवघरे, सुजित मिटकरी, गणेश सुर्यवंशी, मीरा सुर्यवंशी, सविता नवघरे आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती.