आर्य वैश्य महासभा : हातनूर येथे १०१ वृक्षलागवड

आर्य वैश्य महासभा : हातनूर येथे १०१ वृक्षलागवड

मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

सेलू : येथील आर्य वैश्य महासभा शाखा सेलूतर्फे मंगळवारी, ३० जुलै रोजी सेलु तालुक्यातील हातनूर येथील जिल्हा परिषद शाळा तसेच श्री नागनाथ मंदिराच्या परिसरात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण तसेच सेफ्टी नेट लावण्याचा कार्यक्रम या वेळी घेण्यात आला. याप्रसंगी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष माधवअण्णा लोकूलवार साहेब, जिल्हा सहसचिव मोहन कोत्तावार तसेच सरपंच महेंद्र गाढे, जयसिंग शेळके, मंदिर संस्थानचे अध्यक्ष बालासाहेब आंधळे, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर, लक्ष्मण बोराडे मुख्याध्यापक संजय राठोड आदींसह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्य वैश्य समाजबांधव तसेच पदाधिकारी बालाजी काचेवार, बालाजी मोटरवार, विकास गादेवार, नागनाथ कलकोटे, साईनाथ पेडगुलवार, गजानन फुटाणे, योगेश कोटलवार, प्रवीण कोत्तावार, गणेश काचेवार, साई गादेवार सर्व आर्य वैश्य महिला भगिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर फुटाणे यांनी केले. श्री. कालकोटे यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!