विधानसभा निवडणूक : परभणी जिल्ह्यात ४२ नवीन मतदान केंद्र वाढणार

विधानसभा निवडणूक : परभणी जिल्ह्यात ४२ नवीन मतदान केंद्र वाढणार

भारत निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र सुसुत्रीकरणाच्या प्रस्तावास मान्यता

परभणी : जिल्ह्यामध्ये ४२ नवीन मतदान केंद्र आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आली असून, एकूण १६२३ मतदान केंद्र आगामी निवडणुकीसाठी सज्ज करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २९ जून रोजी व सुधारीत कार्यक्रम २४ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने २ ऑगस्टरोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार असून २७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
मतदान केंद्र सुसुत्रीकरण हा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, राजकीय पक्षांकडून प्राप्त सूचना, मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदान केंद्रास प्रत्यक्ष दिलेल्या भेटीच्या अनुषंगाने तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदशक सूचनेनुसार मतदान केंद्राच्या सुसुत्रीकरणाच्या तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
मान्यता देण्यात आलेल्या प्रस्तावात ९५ जिंतूर विधानसभा मतदार संघामध्ये १४ मतदान केंद्राची वाढ होऊन एकूण ४३८ मतदान केंद्र झाली आहेत. ९६-परभणी मतदार संघामध्ये ११ केंद्राची वाढ होऊन एकूण मतदान केंद्राची संख्या ३३८ झाली आहेत. ९७-गंगाखेड मतदार संघात २ मतदान केंद्र कमी केले असून, नवीन दोन मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्राची संख्या ४३२ झालेली आहे. तर ९८-पाथरी मतदार संघामध्ये १७ केंद्राची वाढ होऊन एकूण ४१५ मतदान केंद्र झाली आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!