श्री ज्ञानेश्वरी प्रवचनमाला : सेलूमध्ये श्री ज्ञानेश्वरी प्रवचने; श्रावणमासानिमित्त आध्यत्मिक पर्वणी

श्री ज्ञानेश्वरी प्रवचनमाला : सेलूमध्ये श्री ज्ञानेश्वरी प्रवचने; श्रावणमासानिमित्त आध्यत्मिक पर्वणी

सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रावणमासानिमित्त महिनाभर आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेला सोमवारपासून (५ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. श्रोत्यांसाठी ही प्रवचनमाला सेवा म्हणजे एक आध्यत्मिक पर्वणीच ठरत आलेली आहे.
प्रवचनसेवेचे हे २० वे वर्ष आहे. या वर्षी ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ही प्रवचन सेवा होणार आहे. दरम्यान, २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर कालावधीत सकाळी ७ ते १० या वेळेत सामूहिक श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आलेले आहे. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वसंतराव मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी या प्रवचन सेवेत तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग घेऊन श्रवणाचा तसेच तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

श्रावणमासनिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रवचन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हे २० वे वर्ष कोविड काळातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही प्रवचन सेवा अखंडपणे चालवली गेली आहे. प्रवचन सेवेत श्री ज्ञानेश्वरीवरील गाढे अभ्यासक असलेल्या नामवंत व्यक्तींनी सेवा दिलेली आहे. या प्रवचन सेवेचे वैशिष्ट म्हणजे प्रवचनासाठी निमंत्रित सेवेकरी कसल्याही प्रकारचे मानधन न घेता नियमित सेवा देत आहेत. याशिवाय वेळेची शिस्त,औपचरिकतेला गौणत्व, अभ्यासू श्रोते व आयोजनातील साधेपणा आयोजकांकडून जपल्या जातो.

Sakashnews.com

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!