झोडगाव शिवारातील विहिरीत आढळले एटीएम

झोडगाव शिवारातील विहिरीत आढळले एटीएम

वाळूज परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम, चोरट्याकडून ३ लाख ७५ हजार रुपयेही हस्तगत

सेलू : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील तीन महिन्यापूर्वी एक एटीएम फोडून चोरट्यांनी मशीनच लंपास केली होती. पैशाची वाटणी केल्यानंतर चोरट्यांनी एटीएम मशिन सेलू (जि.परभणी) तालुक्यातील झोडगाव शिवारातील एका विहिरीत आढळून आले आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांसह सेलू ठाण्याच्या पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळास भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव-सिडको परिसरातील जय मल्हार चौकातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशिन चोरट्याने उखडून वाहनात टाकून पसार झाले होते. आरोपीनी सिडको परिसरातूनच एमएच. २० डिई – ३७०२ या क्रमांकाचा टेम्पो चोरी केला होता. एटीएम मशीनमध्ये ७ लाख ४६ हजार १०० रुपये होते. या प्रकरणी वैजापूर शिऊर पोलिसांनी विष्णू रामभाऊ आकात (रा. सातोना, ता. परतुर, जि. जालना) व देवा सुभाष तावडे (रा. पुंडलिकनगर) या आरोपींना पकडले होते. त्यांनी साथीदार लक्ष्मण अवधूत जाधव (रा.वांगी, ता.जि.नांदेड), लकी सुभाष तावडे (रा. पुंडलिकनगर) व महेश लक्ष्मण आकात (रा.सातोना, ता.परतुर) यांच्यामदतीने एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन २२ एप्रिलच्या मध्यरात्री टेम्पोला दोरी व साखळी बांधून ते उखडून नेले होते. कटरच्या साह्याने टेम्पोमध्ये एटीएम मशीन कापून ७ लाख ४६ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केली होती. आपापसात पैशाची वाटणी केल्यानंतर मशीन सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारातील जानकीराम दगडोबा पवार यांच्या विहिरीत फेकून दिली. नुकतीच घटनास्थळी वैजापूर पोलिस व सेलू पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी भेट देऊन मशीन ताब्यात घेतली. शिवाय चोरट्याकडून ३ लाख ७५ हजार रुपयेही हस्तगत केले आहे. सेलू तालुक्यातील झोडगाव येथे या प्रकरणातील चोरट्यांनी विहिरीमध्ये टाकलेले एटीएम मशीन १ ऑगस्ट रोजी चार वाजता काढण्यात आले. या संपूर्ण कार्यवाहीत पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक आयुक्त महेंद्र देशमुख, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस हवालदार डी.एस.जानगर,गणेश सागरे, यशवंत गोबाडे, सुरेश भिसे, प्रशांत सोनवणे, जालिंदर रंधे यांनी ही कार्यवाही यशस्वीपणे केली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!